Young Jackfruit Vegetable
कोवळ्या फणसाची भाजी
Cooking Recipe Video Link:
Youtube Video Link:
भाजीची कृती
साहित्य - तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट, २ ते ३ सुख्या मिरच्या, शिजवलेले शेंगदाणे, मीठ, पाणी, गूळ, ओला नारळ, कोथिंबीर.
कृती - 1) एक पळी तेल कढईमध्ये गरम करून अर्धा चमचा मोहरी, एक चमचा हिंग, एक चमचा हळद, एक चमचा तिखट, २ ते ३ सुख्या मिरच्या घालून फोडणी करावी.
2) पाऊच मधील फणसाची भाजी घालून परतावी.
3) अर्धी वाटी शिजवलेले शेंगदाणे घालावेत, भाजीत मीठ असल्यामुळे चव बघुनच मीठ घालावे.
4) दोन वाट्या पाणी आणि ७० ग्रॅम गूळ घालून वाफ काढून ओला नारळ आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करावी.
उपवासाची भाजी
चार ते पाच चमचे तूप कढईमध्ये गरम करून अर्धा चमचा जिरे, ६ ते ७ सुख्या मिरच्या
घालून फोडणी करावी. पाऊच मधील फणसाची भाजी घालून परतावी. अर्धी वाटी
शेंगदाण्याचे कूट, ७० ग्रॅम गूळ घालून वाफ काढावी. भाजीत मीठ असल्यामुळे चव
बघूनच मीठ घालावे व दोन वाट्या पाणी घालून वाफ काढून घ्यावी. ओला नारळ आणि
कोथिंबीर घालून सर्व्ह करावी.





